लक्ष्मीबाई काशिनाथराव हिमगिरे यांचे निधन ; शुक्रवारी एकलारा येथे अंत्यविधी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 मुखेड : येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिंगमिरे यांच्या मातोश्री, श्रीमती लक्ष्मीबाई काशिनाथराव हिमगिरे (७७) यांचे वृद्धापकाळाने नांदेड येथे खाजगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  दिनांक २७ डिसेंबर रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या मुळगावी एकलारा ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
            श्रीमती लक्ष्मीबाई हिमगिरे यांच्या पश्चात भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगीरे मुलगा, दोन मुली, नातवंडं असा परिवार आहे.
               श्रीमती लक्ष्मीबाई हीमगीरे यांच्या निधनामुळे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड,  माजी आमदार कर्मवीर किसनराव राठोड, माजी आ. अविनाशराव घाटे,माजी आ.सुभाषराव साबणे, व्यंकटराव पा. गोजेगावकर, बळवंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी पाटील आंबुलगेकर, मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, व्यंकटराव पा. चांडोळकर, अशोक गजलवाड, लक्ष्मण पा. खैरकेकर, अनिल कोत्तावार, लक्ष्मण पत्तेवार, डॉ. एम.जे.इंगोले, दादाराव आगलावे,  ज्ञानेश्वर डोईजड, शेखर पाटील,किशोर चौहान आदींनी दुःख व्यक्त केले.