मुंबई, 24 डिसेंबर : अमृता फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी बोचरी टीका केली होती. त्यावरून शिवसेनेही त्यांच्यावर पलटवार करत खडे बोल सुनावले होते. पिंपरी चिंचवडमध्ये या मुद्द्यावर शिवसेना चांगलीच तापली. अमृता फडणवीस यांच्या फोटोलो जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता अमृता फडणवीसांनी पुन्हा एका शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !’ अशा शब्दात अमृता फडणवीसांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
