शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी

  नांदेड, दि. 20 :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्‍यान काही मंडळात अतिवृष्‍टी झाली […]

Continue Reading

हळद व केळी पिकावरील किड, रोग नियंत्रणाबाबत चर्चासत्र संपन्न

  नांदेड, दि. 20 :- अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे कृषिविभाग व शिवास्था फॉर्मर प्रोडयुसर कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने हळद व केळी पिकावरील किड व रोनियंत्रणाबाबत चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीशंकर चलवदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले […]

Continue Reading

कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार : जिल्हास्तरीय समितीची नाळेश्वरच्या शेतीला भेट

  नांदेड, दि. 20 :- कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराच्या निवडीसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील शेतकरी सौ. कमलबाई अन्नाराव धोतरे यांच्या शेतीला भेट दिली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांनी दिली आहे. यावेळी कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा […]

Continue Reading

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 योजनेंअंतर्गत तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे. – जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड डॉ. अमोल यादव

  नांदेड, दि. 19 :- नांदेड जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019″ योजनेंतर्गत 9,905 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरण करण्याची प्रक्रिया बाकी आहे. सदर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. त्याकरिता आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी […]

Continue Reading

मूग, उडीद,सोयाबिन हमीभाव खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी – जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील़

नांदेड, दि. 19 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 मध्ये नाफेडच्यावतीने मूग, उडीद, सोयाबिन खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, सुधीर पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात नांदेड {अर्धापूर}, मुखेड, हदगाव, किनवट, बिलोली {कासराळी}, देगलूर याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे. खरीप हंगाम 2020-21 करीता प्रतिक्विंटल मूग-7 […]

Continue Reading

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँकची भर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

  नांदेड दि. 19 :- जिल्ह्यातील जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण अग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय साकारले असून येथील सुविधेबाबत मी कायम दक्ष आहे. लोकसेवेतील त्यांच्या भावना व नांदेड जिल्हावासियांबद्दल त्यांनी जपलेली कटिबद्धता ही तितक्याच तळमळीने जपून यासाठी जो काही निधी लागेल तो […]

Continue Reading

मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदान आणि त्यागाची मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवू यात – पालकमंत्री अशोक चव्हाण “माझे कुटूंब माझी जबाबदारी” स्विकारण्यातच कोरोनामुक्तीचा मार्ग

  नांदेड दि. 17 :- वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाच्या गोष्टी आपल्या आई-वडिलांकडून ऐकल्या आहेत. मात्र ज्या पिढीने मुक्तीसंग्रामाचा हा लढा, हा जाज्वल्य इतिहास अनुभवला नाही त्या पिढीपर्यंत हा त्याग आणि यातील निस्वार्थ सेवेचे मुल्य पोहोचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपली आहे या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Continue Reading

मुखेड मोतीनाला पुराने नुकसान झालेल्या कुटूंबाना प्रतिमहिना दहा हजार रूपये ,मोफत राशन द्या – मा.क.प ची मागणी

  *अनेकवेळा मागणी करूनही संरक्षण भिंत बांधण्यास टाळाटाळ – जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी* मुखेड / प्रतिनिधी – पवन जगडमवार मुखेड शहरातील मोतीनालाच्या कडेवर गोरगरीब ,कष्टकरी,श्रमीक ,कामगाराने वसलेले महात्मा फुले नगर आणि वाल्मिक नगर येथे दि १६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या पुराने घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.अनेकांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या घरातील […]

Continue Reading

 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी 30 सप्टेंबरपुर्वी महास्वयंम पोर्टलवर माहिती अद्ययावत करावी – सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार

नांदेड :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची नोंदणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने http://www.rojgar.mahaswaya.gov.in हे वेबपोर्टल व गुगल प्लेस्टोअरमध्ये Mahaswaya हे Application विकसित केले आहे. या वेबपोर्टलवर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त‍ रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. […]

Continue Reading

आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी महिला शक्ती आपले सामर्थ्य लावेल पणाला – जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” मोहिमेचा भोसी ग्रामपंचायतीतून शुभारंभ

नांदेड दि. 16 :- अडचणीच्या काळात कुटुंबाला सावरण्यास आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत कुटुंबाला उभे करण्याचे जन्मजात सामर्थ्य महिलांमध्ये दडलेले आहे. वेळोवेळी महिलांने हे आपले सामर्थ्य सिद्ध करुन दाखविले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या या काळात आता पुन्हा एकदा घरातील सर्व सदस्यांसमवेत महिलांना सज्ज होऊन कुटुंब सावरण्याची जबाबदारी आली असून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” या मोहिमेत त्या […]

Continue Reading