वाराणसीत अडकलेल्या नांदेडच्या 35 भाविकांची वैजनाथ स्वामी यांनी थेट जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना संपर्क करून जंगमवाडी मठात व्यवस्था करण्याची केली विनंती

नांदेड : प्रतिनिधी वाराणसीत लॉकडाऊन झालेले नांदेडच्या 35 भावीकांसाठी वैजनाथ स्वामी यांनी थेट जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना संपर्क करून जंगमवाडी मठात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली विणंती. जगात सर्वत्र कोरोना या संकटामुळे अनेकजन विविध देेशात राज्यात शहरात लॉकडाऊन झाले आहेत.काही दिवसा पुर्वीच ऊझबेकिस्थान ताशकंद या देशातुन 40 महाराष्ट्रातील डॉक्टर लोकासहीत भारतातील एकुन […]

Continue Reading

कोरोना : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेसोबत ठामपणे उभा आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य […]

Continue Reading

 देशावरील कोरोनाचे संकट जाऊ दे म्हणत गुढीपाडवा साजरा 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण लागल्याने देशासमोरील कोरोनाचे  संकट जाऊ दे म्हणत  मुखेडात गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्यात आला. हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव […]

Continue Reading

नांदेडात गोळीबार ; एकाचा मृत्यू एक गंभीर

नांदेड :प्रतिनिधी शहरातील देगलूर नाका परिसरातील  दोन युवकात  कौटूबिक जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना दि 25 रोजी घडली यामध्ये गोळीबारात  एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे .जखमीस  शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार हा कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती आहे. Post Views: 4,006

Continue Reading

कोरोनाच्या भीतीने पुण्याहून आले मुखेडमध्ये हजारो नागरिक    मुखेडमधील मराठवाड्यातून जास्त पुणे, मुंबई येथे नागरिक

प्रशाकीय  यंत्रणा सज्ज पण मनुष्यबळ कमी  ; उपजिल्हा रुग्णालयात होत आहे तपासणी मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक  पुणे शहरात आढळल्याने मुखेडमधून कामाला गेलेले हजारो नागरिक आता परतीची वाट धरत असून खाजगी ट्रॅॅव्हल्स भरून नागरिक मुखेडकडे येतानाचे चित्र दिसत असून पुण्यासह ईतर महानगरमधून आलेल्या नागरिकांची  उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे तपासणी होत आहे. मुखेडसह अनेक तालुक्यातील नागरिक सुद्धा […]

Continue Reading

जिप अध्यक्षाच्या मतदारसंघातील गावांत चोवीस तासापासून वीज गायब       महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका;  नागरिकांची गैरसोय           मुक्रमाबाद – बाराहाळी परिसरातील चाळीस गावे अंधारात 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड               नांदेड जिप अध्यक्षा सौ मंगारणी अंबुलगेकर यांचा मतदारसंघ असलेल्या  बाराहाळी परिसरातील गावांना महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसला असून गेल्या चोवीस तासांपासून  मुक्रमाबाद – बाराहाळी परिसरातील ४० गावात विज गायब झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. Post Views: 132

Continue Reading

कोरोना इफेक्ट : सरकारने ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात […]

Continue Reading

 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी ; जिल्हा प्रशासन सुसज्ज –        जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर  

     नांदेड : वैजनाथ स्वामी  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा प्रशासन सुसज्ज असून कोरोना संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करुन विषाणुंच्या संसर्गात वाढ होऊ न देता त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी […]

Continue Reading

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवावेत – जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे निर्देश

नांदेड : वैजनाथ स्वामी  करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय,व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यदक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्येा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक / मालक यांची बैठक घेण्यात […]

Continue Reading

आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रात मोफत सेट/नेट कार्यशाळा संपन्न.

उदगीर/प्रतिनिधी उदगीर येथील मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित “आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राच्या” वतीने उदगीर तालुक्यातील व परिसरातील ज्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न आहे पण आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सेट/नेट चे शिकवणी लावण्यासाठी मोठमोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत अश्या अनेक विद्यार्थ्यांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावं त्यांना योग्य ते मार्गदर्शन […]

Continue Reading