नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान

नायगाव : वैजनाथ स्वामी नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार दि.28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत आहे. भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून […]

Continue Reading

मुखेडातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठणठणीत बरा ; त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह रुग्णवाहिकेने सोडण्यात आले त्याच्या मुळ गावी

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड मुखेड मध्ये नायगांव तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवाशी असलेला रुग्ण दि. २० रोजी आढळला होता. यामुळे संपुर्ण मुखेडात खळबळ उडाली होती पण तो रुग्ण दि. २८ रोजी ठणठणीत बरा झाल्या असुन आरोग्य विभागाच्या वतीन हार घालुन त्यास मुळ गावी पाठविण्यात आले. हा रुग्ण दि. १३ मे रोजी दहीसर येथुन टेंपोने प्रवास करुन […]

Continue Reading

केतन चौधरी यांच्या वतीने नागरिकांना अर्सेनिक अल्बम-३० एक लाख गोळ्याचे वाटप

मुखेड : संदिप पिल्लेवाड शहरातील तग लाईन येथील रहिवाशी कैलास सावकार चौधरी यांचे सुपुत्र केतन चौधरी मातृभुमीची जान ठेवुन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात सेवा देणा-या नगर परिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार, बँक कर्मचारी, महामंडळ कर्मचारी, तग लाईन, राम मंदिर गल्ली, मित्र परिवार व पत्रकार यांना १०० गोळ्याची एक डब्बी असे […]

Continue Reading

कर्तृव्यात कसुर केल्याप्रकरणी तीन अधिकारी,दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस

सतत गैरहजर राहणे व उपाययोजने सबंधी निष्काळजिपणा भोवले मुखेड : संदीप  पिल्लेवाड  कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजने संबधी मुखेड तालुक्यातील डोरनाळी या गावी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व तेथिल कार्यरत कर्मचारी मुख्यालयी न रहाता सतत गैरहजर राहणे व गावात उपाययोजना बाबतीत कोणतेच काम वेळेवर करत नसल्याची लेखी तक्रार तहसिलदार यांच्याकडे […]

Continue Reading

तलवारे दाम्पंत्याचा कोरोना संकट काळात स्त्युत्य उपक्रम            लग्नाच्या वाढदिवशी केली अकरा हजार रुपयांची मदत

मुखेड : ज्ञानेश्वर  डोईजड आज काल लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सोशल मिडीयावर खुप होताना दिसत आहे पण कोरोनाच्या संकट काळात लग्नाच्या वाढदिवशी प्रशासनाला अकरा हजार रुपयांची मदत मुखेड शहरातील दाम्पंत्य बालाजी तलवारे व सौ. पुनम बालाजी तलवारे यांनी केली . कोरोनाच्या संकट काळात अनेकावर उपासमारीची वेळ आली आहे. आपण शांतपणे झोपू शकलो तरी अनेक गोरगरीब , […]

Continue Reading

नांदेड जिल्ह्यात आर्सेनिक अल्बम 30 चे औषध,गोळ्या मोफत वितरण करा-महेंद्र गायकवाड

नांदेड : नांदेड जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावागावात , ग्रामीण भागात सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांनीही मोफत आर्सेनिक अल्बम 30 औषध वितरणासाठी पुढाकार घ्यावा व जिल्हा प्रशासनाने मोफत औषध व गोळ्या संबंध जिल्ह्यात मोफत वाटप कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांनी केली आहे. केंद्र […]

Continue Reading

तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा. जिल्हा प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांची मागणी

दत्ता पाटील माळेगावे  खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणीसाठी खते बियाणे औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे,कोरोनाव्हायरस मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होण्यासाठी व बोगस बियाणे खते कीटकनाशके यांची जादा दराने विक्री होऊ नये व कोणत्या प्रकारची शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये याबाबत ग्रामस्तरावर आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी, […]

Continue Reading

नमस्कार नांदेडकरांना.. “ते उपाशी झोपत असतील… तर आपल्याला झोप येईल का..?”

आमची जेवढी ताकत होती तेवढी पूर्ण पणाला लावून गेल्या 66 दिवसापासून धान्य, किराणा आणि अन्नाचं वाटप सुरू आहे. जवळ होतं नव्हतं सगळं पणाला लावलंय… पण तरी बरच करायचं बाकी राहिल्याची खंत बैचेन करत आहे. कुणी तीन तीन दिवस नुसतं पाण्यावर काढत असेल तर यापेक्षा वाईट काय असणार आहे या जगात…! झोपडीत राहणारी ती बाई “भाऊ,दोन […]

Continue Reading

कोरोनाचे संकट ओळखून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच सुरक्षितपणे साजरी करा : धनगर समाजाचे जेष्ठ तथा नेते माजी न.प.उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे

मुदखेड  : रुखमाजी शिंदे या वर्षीचे कोरोनाचे संकट ओळखून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरांत करा परंतु घरीच सुरक्षितपणे साजरी करा असे आवाहन मुदखेड येथील धनगर समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी न.प.उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी व्यक्त केले आहे. दरवर्षी दि.३१ मे रोजी मुदखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.परंतु […]

Continue Reading

शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करा ; अन्यथा १ जूनपासून राज्यभरात आंदोलन – – एसएफआय

मुखेड : पवन जगडमवार स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीने शिष्यवृत्तीचे त्वरित वितरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १ जूनपासून राज्यातील विविध जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसएफआयने दिला आहे. याबाबतचे निवेदन ईमेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे यांना एसएफआयने पाठवले आहे. एसएफआयने निवेदनात म्हटले […]

Continue Reading