औरंगाबाद मुखेड गाडीला अपघात ..तीन ठार पंधरा जखमी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण राष्ट्रीय

 

चंदनसावरगाव जवळ भिषण अपघात; तीन ठार पंधरा जखमी

औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची आणि समोरून येणार्‍या बोलेरो पिकअपची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात तीन जन जागीच ठार झाले तर १५ पेक्षा अधिक जन जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

सदरचा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास केज अंबाजोगाई जवळील चंदनसावरगाव रस्त्यावर घडला. अपघातीतल जखमींना स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा दरम्यान मागील तीन वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून मुखेडकडे निघालेली एसटी बस क्र.(एम.एच.२० बी.एल.३७२१) या बसचा आणि बोलेरो पिकअपचा भिषण अपघात झाला. हा अपघात तिहेरी असल्याचा सांगण्यात येते. सदरच्या अपघातामध्ये बसमधील तिघेजण जागीच ठार झाल्याचे सांगण्यात येते.

अपघातात १५ पेक्षा अधिक जन जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. जखमींना स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त लवकरच…