भाजपने तिकीट दिल्यास नौकरी सोडून स्वंयसेवक म्हणुन अविरत जनतेची सेवा करणार – रामदास पाटील

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

नांदेड :  वैजनाथ स्वामी / पवन क्यादरकुंठे

               मुखेड – कंधार मतदार संघातून भाजपा पक्षाकडून पक्षश्रेष्ठीने माझ्या नावाचा विचार केल्यास व तिकीट दिल्यास मुख्याधिकारी पदाची नौकरी सोडुन मा नरेंद्र मोदी यांच्या विचारावर चालत एक स्वंयसेवक म्हणुन जनतेची अविरत सेवा करणार असल्याचे मुख्याधिकारी पदी असलेले व सध्या मुखेड – कंधार मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी चर्चेत असलेले धर्मभुषण रामदास पाटील यांनी लोकभारत न्युज शी बोलताना म्हणाले. 
                     लहाणपणापासुनच शाखेचे विचार मनात रुजल्याने सामाजिक कार्याची आवड झाली यामुळे समाजात नेहमी काहीतरी सामाजिक उपक्रम करण्याचा छंद तर अभ्यासातही हुशार असल्याने तरुण वयातच नौकरी मिळाली. पण नौकरीतही सामाजिक कार्य करुन अनेक वंचितांना न्याय देण्याचे काम रामदास पाटील यांनी केले यामुळे तरुण वयात व अल्पावधित ते जनतेला हवेहवेसे वाटू लागले. याच कारणाने किनवट येथे त्यांच्या नावावर तेथील नागरीकांनी रामदास पाटील मार्ग म्हणुन एका मार्गाचे नामकरण केले. तर मुखेड पासुन जवळच असलेल्या देगलुर येथे मुख्याधिकारी काम करण्याची त्यांना संधी सुध्दा मिळाली त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीने येथील नागरीकांना व कर्मचा­यांना ते आपलेसे वाटु लागले.
                      त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव राष्ट्रपती, मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांनी सुध्दा केला यामुळे कामाची व समाज कार्याची ऊर्जा नेहमी पेटत गेली. पण सामाजिक कार्य करत असताना लोकप्रतिनिधी म्हणुन आपल्याला याच्यापेक्षाही चांगले काम करता येईल व गोर गरीबांना व वंचितांना योग्य न्याय देता येईल यासाठी मुखेड – कंधार मतदार संघातून भाजपा पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याचा निर्धार रामदास पाटील यांनी केला आहे. 
                     मुखेड – कंधार मतदार संघात जातीय समीकरण्याचा विचार केल्यास रामदास पाटील हे लिंगायत समाजाचे असल्याने तालुक्यात हटकर – धनगर यांच्या नंतर लिंगायत समाज असुन याचा मोठा फायदा सुध्दा त्यांना होऊ शकतो. तर मुखेड मध्ये भाजपाचा पारंपारीक मतदार 60 ते 70 हजार असुन तो मतदार भाजपाच्या पाठीशी नेहमी असतो तर आतापर्यंत जिल्हयात भाजपाने लिंगायत समाजाला प्रतिनिधीत्व न दिल्यामुळे रामदास पाटील यांच्या रुपाने मुखेड – कंधार मतदार संघामध्ये लिंगायत चेहरा देऊन भाजपा एक तिर मे दोन निशान करेल अशी शक्यता नाकारता येत नाही.
                  ना खाऊंगा ना खाने दुँगा या मा. नरेंद्र मोदीजींच्या शब्दावर प्रभावित मी नौकरी सोडुन दयायला सुध्दा तयार असुन भाजपाने मला मुखेड – कंधार मतदार संघातून एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दयावी मी कधीही जनतेला निराश करणार नाही व मुखेड – कंधार मतदार संघ हा माझे गाव सोमठाणा येथून केवळ दोन कि.मी. च्या जवळ आहे त्यामुळे येथील जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे असेही रामदास पाटील यांनी सांगितले. 
                   रामदास पाटील हे 2009 एमपीएससी च्या बॅचकडून मुख्याधिकारी पदी रुजु झालेले अधिकारी असुन ते सध्या हिंगोली येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत आहेत. उच्च शिक्षित विद्याविभूषीत उमेदवार मुखेड – कंधार मतदार संघाला मिळाल्यास मुखेडची जनता स्विकारते की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण मुखेड मतदार संघात रामदास पाटील एक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ता, शिस्तबध्द अधिकारी व संघाच्या विचारात वाढलेला एक स्वयंसेवक अशा अनेक रुपात असल्याने त्यांच्या नावाच्या चर्चेने भल्या भल्याचे धाबे दनानले हे मात्र खरे.