मुखेड आगारात लालपरीचा ७१ वा वर्धापण दिन उत्साहात साजरा 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
   उन्हाळा असो की पाऊसाळा सदैव प्रवाशांची काळजी घेवुन सावली देणाऱ्या व प्रवाशांना सुरक्षीत त्यांच्या घरी पोहचवणा-या लालपरीचा म्हणजेच एस.टी.चा ७१ वा वर्धापण दिन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुखेड आगाराच्या वतीने केक कापून दि. १ जुन रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारव्यवस्थापक एस.टी.शिदे हे होते तर प्रमुख पाहुने मुखेड कंधार विधानसभेचे आ.डाॅ.तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, प.स.सदस्य लक्ष्मण पाटील खैरकेकर, बालाजी पाटील बिल्लाळीकर, शिवाजी राठोड, अमरसिंह ठाकुर, कृष्णाजी कांबळे, अशोक पाटील गुट्टे, दिलीप चव्हाण, नगर परिषदेचे आमीर शेख सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक एस.जी.मरदोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.एस.जाधव यांनी केले तर प्रस्तावणा एन.पी. कोरे, उपस्थितांचे आभार श्रिकांत गोणारकर यांनी मानले .   कार्यक्रम यशस्वितेसाठी आगारप्रमुख शिंदे,सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक एस.जी.मरदोडे, वाहतूक निरीक्षक नरसिंग मरकंटे, स.वाहतूक निरीक्षक एन.पी.कोरे, एम.जी.घोणसे, पि.डी.गायकवाड,मुख्य यांञिक  बी.डी.ठाकुर, उत्तम धोंड,मनोज कांबळे, बालाजी नगरे, सौ.कल्पना पांचाळ, , प्रताप कोल्हे,  प्रकाश वदुलवाड सह मुखेड आगरातील अधिकारी, वाहक,चालक ,यांञिक आदि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


   यावेळी प्रवाशांना गुलाब पुष्प देवून पेढे वाटप करण्यात आले व त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुखेड आगाराच्या वतीने एस.टी.च्या ७१ व्या वर्धापण दिनाचे अौचीत्य साधून तेथील कर्तव्यदक्ष कर्मचारी सिद्धार्थ गंगावने व ए.एच.कवटीकवार यांचा वाढदिवसही १ जुन रोजीच असल्याने एस.टी.चा वर्धापण दिन व कर्मचाऱ्यांचा वाढदिवस एकत्रितपणे साजरा करण्यात आला.