या कारणामुळे चिखलीकरांना मिळु शकते मंत्रीपद…!

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या राजकारण राष्ट्रीय

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

        नांदेड लोकसभेत भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव करुन विजय मिळविला. येणाऱ्या विधानसभेला नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांना अजुन टक्कर देण्यासाठी नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकरच्या रुपाने चेहरा मिळाला असुन मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना मंत्रीपद मिळू शकते ? 
       औरंगाबाद मध्ये युतीचा पराभव झाला असून नांदेड, परभणी , हिंगोली, बीड, जालना, लातूर  या जागा मराठवाडयातून युतीला मिळाल्या आहेत. या सर्व मराठवाडयाच्या लोकसभा मतदारसंघातून  सुध्दा चिखलीकरांना पसंती होऊ शकते. तसेच नांदेडमधून राज्याच्या विधानसभेत सर्वच जागा युतीला जिंकण्यासाठी व मराठवाड्यात भाजपच्या विस्तारासाठी तसेच  मातब्बर चेहरा म्हणुन चिखलीकरांना पसंती मिळणार का ? हे लवकरच स्पष्ट होईल. पण एकंदरीत पाहता लोकभारत न्यूज च्या सूत्रानुसार चिखलीकरांंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे !