माळरानात केली वन्य प्राण्यासाठी पाण्याची सोय … उमरदरी येथील शेतकरी कोनापुरे यांचा स्तुत्य उपक्रम

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

    जिप्सी ग्रुपच्या वतीने सत्कार,अशा शेतकऱ्यास प्रशासनाची थाप गरजेची..! 

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
             तालुक्यात पाण्याचा तीव्र दुष्काळ असून पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे . नदी, नाले, विहिरी,  बोअर कोरडे पडले आहेत पाण्याचे कसलेच स्त्रोत नाहीत. अशा परीस्थित पाण्याच्या एका थेंबासाठी पशु, प्राणी या भागातून त्या भागाकडे वणवण भटकावे लागत असल्यामुळे तालुक्यातील उमरदरी येथील शेतकरी मारोती ज्ञानोबा कोनापुरे यांनी गरीब परिस्थितीतही पोटाला गाट बांधून उमरदरी, होकर्णा व तांदळी तांडा परिसरातील जनावरासाठी व वन्य पशुप्रन्यासाठी पानवटे बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. 
            पाण्याच्या शोधासाठी वन्य प्राणी गावाकडे येतात व गावठी कुत्र्याचे शिकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत वन्य प्राण्याचे व मुक्या जनावारांची पाण्यासाठी होणारी हाल लक्षात घेत भटकंतीवर मात करण्याचे  संकल्प करुण मारोती कोनापुरे यांनी उमरदरी शिवारात पानवट्टे बांधून पिण्याची सोय केली असून मुक्या प्राण्याना पाणी पाजवण्याचे पुण्यकर्म करीत असल्याने त्यांच्या कार्याचे परिसरातील शेतकरी, पशुपालक कौतुक करीत आहेत तर अशा शेतकऱ्यावर प्रशासनाने कौतुकाची थाप दिल्यास प्रत्येक शेतकऱ्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.
          त्याच्या कार्याची दखल घेत जिप्सी मार्निग ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिप्सी ग्रुपचे अध्यक्ष संजय वाघमारे, उमरदरीचे सरपंच शिवाजी कोनापुरे, किशोरसिंह चौहान, दादाराव अगलावे, शेखर पाटील, बलभीम शेंडगे, ज्ञानेश्वर डोईजड, हणमंत गुंडावार, राजू फुलवळकर, गोविंद पाटील, वैजनाथ दमकोंडावार, चरणसिंह चौहान, बालाजी तलवारे, भास्कर पवार, उमाकांत डांगे, अनिल पेदेवार, राजेश भागवतकर, संतोष स्वामी, उत्तम अमृतवार सागर चौधरी, विनोद रोडगे, संदीप पोपळे सुरेश उतरवार, नंदकुमार काचावार, गुपित कांबळे अदिसह बालाजी कोनापुरे आदी उपस्थित होते.