काँग्रेस जिल्हा प्रवक्तापदी दिलीप कोडगिरे यांची नियुक्ती

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 
येथील काँग्रेसचे ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाप्रवक्ते पदावर करण्यात आली आहे. 
    माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष गोविंदराव पा.शिंदे नागेलीकर यांनी दिलीप कोडगिरे यांची नियुक्ती करून सदर नियुक्तीपत्र कोडगिरे यांना माजीमंत्री आ.डी.पी.सावंत यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले. दिलीप कोडगिरे हे आपल्या विद्यार्थी दशेतूनच सुमारे ३५ वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान व कडवे कार्यकर्ते म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा काँग्रेसची बाजू मांडताना त्यांनी कट्टरवादी लोकांचा रोष ओढवून घेऊन संकटांशी सामना केला आहे. पक्षाच्या चढ- उतारात खंबीरपणे सोबत राहून साथ दिली. प्रवाहात पक्ष आणि नेत्यांकडून उपेक्षा झाली तरी पक्षनिष्ठ राहून कार्यरत राहिले. त्यांनी मुखेड शहरकार्याध्यक्ष व तालुका प्रवक्ते पदावर प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. 
     दिलीप कोडगिरे यांची काँग्रेसनिष्ठा, पक्षातील प्रदीर्घ कार्य आणि अभ्यासपूर्ण लढाऊ प्रवृत्ती याची दखल घेऊन ज्येष्ठ नेते शेषराव चव्हाण,नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांचे शिफारसीने खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांद्वारे काँग्रेस जिल्हाप्रवक्ता पदी कोडगिरे यांची नियुक्ती केली आहे. लढाऊ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांस न्याय दिल्याबद्दल काँग्रेससह सर्व पक्षात आणि परिसरात समाधान व्यक्त केला जात असून दिलीप कोडगिरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे मा.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,मा.शेषराव चव्हाण,मा.बाबुराव देबडवार,मा.डाॅ.दिलीप पूंडे,डाॅ.अशोक कौरवार,नंदकूमार मडगुलवार,दत्तात्रय चौधरी,अनीलसेठ जाजू,जगदीशजी बीयाणी,राहूल लोहबंदे,शामसूंदर एमेकर,डा.श्रावण रॅपनवाड,संजय रावणगांवकर,शिवकुमार बंडे,प्रभाकरराव पाटील खंडगांवकर,डाॅ.रणजीत काळे,रामेश्वर ईंगोले,खाजा धूंदी,सुधाकर जाधव,सचीन श्रीरामे,पत्रकार किशोर संगेवार,सूनील पौळकर,दादाराव आगलावे,सूशील पत्की,संदीप कामशेट्टे,ज्ञानेश्वर डोईजड,शेख रीयाज,संजय कोडगिरे,गूट्टे गूरुजी,…. 
, आदिंसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.