बेटमोगरा प्राथमिक आरोग्य केंद्रास ठोकले कुलुप

इतर बातम्या ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

    वैद्यकिय अधिका­री सतत गैरहजर असल्याचा आरोप

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा दबडे हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे रुग्णांची हेळसांड पाहुन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दिलीप भद्रे यांनी प्रा.आ.केंद्र बेटमोगरास दि. 30 रोजी सकाळी 11.30 वाजता कुलुप ठोकण्यात आले. 
          डॉ. वर्षा दबडे हया सतत गैरहजर राहत असुन त्यांनी रुग्णांची काळजी राहत नाहीत अनेक दिवसापासुन ते अशाच प्रकारे गैर हजर राहुन आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाहीत. याबाबत गावातील काही नागरीकांनी वरीष्ठांना तक्रार केली होती पण याची कोणीही दखल घेतली नाही त्यामुळे डॉ. दबडे यांचे मनोबल आजुन वाढून सतत गैरहजर राहण्याचा सपाटा त्यांनी चालुच ठेवला तर डॉ. दबडे हया एका राजकीय नेत्याच्या सुन असल्यामुळे येथील आरोग्य प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याची गावक­ऱ्यात चर्चा आहे.
           अशा अधिका­ऱ्याच्या मनमानी कारभाराला राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याचे गावातील नागरीकांतून ऐकायला मिळत आहे. बेटमोगरा हे गाव माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी जिप अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व सध्या जि प सदस्या असलेल्या सौ. सुशिलाबाई हाणमंतराव बेटमोगरेकर यांचे गाव आहे.