गावकऱ्यांनो आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी,घरातच रहा,प्रशासनास सहकार्य करा- एसडीओ पवन चांडक

नांदेड जिल्हा मुदखेड

मुदखेड : रुखमाजी शिंदे

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुदखेड तालुक्यातीलरोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे जाऊन मंदिरातील लाउडस्पीकरद्वारे रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी वासियांनो,आपण,आपले गाव कोरोना संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी घरातच रहा,घाबरु नका,प्रशासन सर्व सहकार्य करेल असे आवाहन भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी केले आहे.

दि.२५ बुधवार रोजी दुपारी १ दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी तालुक्यातील रोहीपिंपळगाव,गोपाळवाडी येथे भेट देऊन गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने लाॅकडाऊन माध्यमातून आवाहन केले, संचार बंदी लागु केली आहे,नागरिकांनी घरातच राहवे, घाबरून जाऊ नये,विनाकारण रस्त्यावर फिरू नये,बाहेरील गावातील नागरिक गावात आल्यास प्रशासनाला माहिती द्यावी,अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा उभारण्यात आली आहेत.तसेच बाहेरील पुणे,मुंबईत नागपूर किंवा इतर राज्यातुन येणा-या नागरिकांनी आपल्या परिवारांच्या आरोग्यासाठी पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी करुन घ्यायला पाहीजे.आम्ही एक जणजागृतीचा भाग म्हणुन रोहीपिंपळगाव आणि गोपाळवाडी येथे मी आलेलो आहे,प्रत्येकांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी,प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,आपण आणि आपले गाव कोरोना मुक्त राहण्यासाठी प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजना,जनजागृती मोहीम यासाठी हा उपाय म्हणून गावातील नागरीकानी हा पर्याय केला आहे.गावातील घरामध्ये रहावे,बाहेर गर्दी करु नका,प्रशासन तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे असे उपविभागीय अधिकारी पवन चांडक असे आवाहन यांनी केले,यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दिनेश झांपले,मुदखेड ठाण्याचे सपोनि विश्वांभर पल्लेवाड,माजी जि.प.सदस्य गणेशराव शिंदे,सरपंच आदि उपस्थित होते.