देगलूरमध्ये गोर गरीबांना प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचा मदतीचा हात

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर : प्रतिनिधी

संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्याने देगलूर तालुक्यातील गरीब गरजू नागरीकाना  प्रा. उत्तमकुमर कांबळे  यांच्या वतीने मदतीचा हात म्हणून अन्नधान्य वाटप करण्यात आले.

 

सरकारने लॉकडाऊन केल्याने अशा परिस्थितीत वंचित , गरीब हातावरचे पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना उपासमारीने मारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर मात म्हणून अनेकांचे मदतीचे हात पुढे येत आहेत
देगलुर तालुक्यातील गोर परीरांना मदतीला प्रा उत्तामकुमार कांबळे धावून आले.

 

यावेळी देगलूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान धबाडगे ,
अजय लोणे, विनय कांबळे , विशाल बोरगावकर यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येक कुटुंबीयांना ५ कीलो गहू आणि ५ किलो तांदूळ तसेच साखर आणि चहा पत्ती अर्थात पुरवठा करण्यात आला.