आधीच लॉकडाऊन अन त्यात जळाला पंधरा हजाराचा कडबा ; संकटे संपता संपेना 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
शहरातील शाहू नगर मधील  निवृत्ती शंकर कांबळे यांचा दिनांक २६ मार्च रोजी दुपारी ३.३० सुमारास अचानक लागलेल्या आगीत तब्बल पंधरा हजाराचा कडबा जळून खाक झाला .
    आधीच लॉकडाऊन मुळे बाहेर निघत येईना अन गाई वासरासाठी ठेवलेला कडबा अक्षरशः डोळ्यासमोर जळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले.
आगीने रौद्र रूप पकडल्याने आग आजूबाजूला पसरण्याची शक्यता होती पण स्थानिक नागरिकांच्या व अग्निशमन दलाच्या सहकाऱ्याने आग आटोक्यात आली व  होणारा अनर्थ टळला.
 आग आटोक्यात आनण्यासाठी नपा सहित माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, नगरसेवक मैनोदिन शेख , गौतम कांबळे, गौस शेख ,रविराज भद्रे, कैलास बनसोडे ,मिलिंद कांबळे,गणेश आंबेकर यांनी सहकार्य केले.
आगीत झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई  ताबडतोब मिळावी अशी उपस्थितांकडून मागणी केली गेली.