मराठवाड्यात अफवांना ऊत;एकदा झोपल की कायमचच झोपणार अफवावर विश्वास ठेऊ नका

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
पवन कँदरकुंठे
नांदेड: काल राञी सगळीकडे अफवा पसरली की अमूक लेकरू बोलत आहे की “झोपलेले झोपीतच राहतील आणि जागी आहेत ते जागीच राहतील” . यामुळे नांदेड- हिंगोली -लातूर- परभणी यांच्यासह  जिल्ह्यातील लोक रात्रभर जागी राहिली.
आशी अफवा 2015 साली आली होती. त्यावेळस नेट चालवनारे यूजर्सही कमी होते तरीही तितक्याच वेगाने हे अफवा पसरली होती. आत्ता तर लोक रिकामी आहेत घरी बसून आहेत. देश्यामध्ये एक सिस्टिम अशी नक्कीच काम करतेय. तिचा शोध घेण गरजेच आहे. देश आणि जग भयान संकटातून जात आहे तस असताना ह्या अफवा पसरवन साहजिकच आहे.
कारण की आपल्या देशातील लोक त्या गोष्टीला फार लवकर दूजोरा देतात. आपण विचार, चिंतन, चिकित्सा या गोष्टीवर कधी करत नाही.
काल संध्याकाळी आप्तेष्टांची फोन यायला लागली की झोपू नका. खरतर आपल्यावर नाहीतर जगावर ओलांडलेल्या भयान संकटाला सामोर जात असताना. आता सतर्क राहण गरजेचे आहे..  आपल्या प्रियजनांना समजावून सांगा कूठल्याही अफवेला बळी पडू नका . कारण आपला हा भारतीय समाज खूपच भावनिक आहे. कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीचा सामना करताना हा नक्किच दैवतीकरणावर जाईल आणि स्वत:ला गमावून बसेल. त्याचबरोबर स्वत:ला सूशक्षित म्हणणारी मंडळी पण त्याच्यात सामील होतांना दिसतय. बांधवानो गांभीर्य राखा सूशक्षित लोकांनी आपल्या बसल्या घरीच परिवारांना जाग्रत ठेवा चुकीच्या अफवा, यापासून दूर ठेवा.
 असल्या अफवेला चालना देऊन आज जे दिवसराञ मेहनत करत आहेत त्या मध्ये डाँक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार, पञकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मेहनतीवर पाणी फिरवू नका.
सतर्क रहा प्रशासन आपल्याला पाहतेय, व्हाटसअप् ,फेसबुक, टिकटाँक व ईतर सोशल नेटवर्कच्या साईडवरून अफवा पसरवू नका. अशा फालतू अफवांवर कोणीही बिलकुल विश्वास ठेवून कलम 144 जेवण करून आला म्हणून तर देऊ नका.
काय चाललंय काय , शिक्षण घेऊनही काही अनपड’  काही गावाकडील शेतकरी मंडळी त्यांना तर खुपचं मरणाची भीती,त्यात झालं कमी तर करणार जास्त. मित्रानों कानाचा नी डोळ्यांचा फरक असतो.
आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारण म्हणजे  अंधश्रद्धा आहे. आणि त्याचा प्रसार करण अजामीनपात्र गुन्हा आहे.