मुक्रमाबाद येथे हेमंत खंकरे यांच्या वतीने मोफत मास्क वाटप 

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड

पवन क्यादरकुंटे

              मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य  असलेले हेमंत बंडेप्पा खंकरे  यांच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी  मोफत मास्कच वाटप करण्यात आले .

लवकरच हँन्ड वाँश स्टेशन ची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून मास्कची आवश्कता असल्यास  घरपोच मास्क सुद्धा पाठवण्याची व्यवस्था खंकरे यांनी केली आहे . मास्क वाटप करण्यासाठी त्यांच्यासोबत राजेश्वरजी देशमुख, अशोकराव देशमुख, आरोग्य अधिकारी डाँ संगमेश्वर खंकरे, चाँदसाब शेख आदी उपस्थित होते. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.