आगीत घर जळालेल्या घाटे कुटुंबास बोनलेवाड यांच्याकडून आर्थिक मदत 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड 
 
             मुखेड तालुक्यातील येवती येथील सतीश घाटे यांच्या घरास  गॅसच्या गळतीने आग लागली होती त्या आगीत संसार उपयोगी साहित्यासह सर्वकाही जळून खाक झाले होते. या घाटे परिवारास येवतीचे जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधि संतोष बोनलेवाड यांनी आर्थिक मदत केली . 
              तसेच या कुटुंबास जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी प. स. सदस्य वसंतराव पाटील  मैनु शेख ,संदीप पाटील सुडके,विलास घाटे,आखिल येवतीकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.