महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नांदेड येथील नवीन इमारतीस पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

नांदेड : वैजनाथ स्वामी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नांदेड येथील इमारतीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.
मंडळाच्या योजना, उपक्रमाबाबत प्रत्येक उपक्रम हॉलला भेट देवून योजना उपक्रमाबाबत औरंगाबाद विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आययुक्त मनोज पाटील, नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी माहिती दिली.

कामगार कल्याण भवनाचा जास्तीत जास्त उपयोग हा कामगारांना कसा होईल यासाठी नवीन उपक्रम सुरु करावा. व कामगारांना त्याचा लाभ कामगारापर्यंत कसा पोहचेल यासाठी प्रयत्न करावेत, अशीही सुचना पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केली. तसेच एकंदरीत सुरु असलेल्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले.

यानंतर मंडळाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे औरंगाबाद विभागाचे सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत,जिल्हाधिकारी विपीन इटणकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,औरंगाबाद विभागाचे सहा. अधीक्षक बी.पी.जरारे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस आदिंची यावेळी उपस्थिती होती.