…आणि मी होकार दिला- सौ.अमिता अशोकराव चव्हाण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र

नांदेड : वैजनाथ स्वामी

व्हॅलेंटाईन दिनाचं औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमित चव्हाण यांची प्रकट मुलाखत अभिनेता रितेश देशमुख नांदेडमध्ये घेत आहे. यावेळी त्याने अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांना अनेक प्रश्न विचारत आयुष्याच्या अनेक हळव्या क्षणांवर तसंच सुख-दुखा:च्या आठवणींवर बोलतं केलं.

समोरच्या व्यक्तीमधील आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते. तो व्यक्ती आपल्या मनात बसतो आणि मग आपण ठरवतो की बस्स… हाच तो व्यक्ती आहे की ज्याच्याशी आपण लग्न करायचं आणि सुखी संसार थाटायचा… असं आपण अशोक चव्हाण यांच्यामध्ये काय पाहिलं??, असा प्रश्न रितेशने अमिता यांना विचारला. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामधला प्रामाणिकपणा (honesty) मला सर्वाधिक भावला अन् मी लग्नाचा निर्णय घेतला, असं अमिता यांनी सांगितलं.