सारंग बकवाड यांना महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / पवन जगडमवार

महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र, यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद हायस्कूल मांजरम येथील सहशिक्षक सारंग दिगंबरराव बकवाड आडमाळवाडीकर यांना आमदार डॉ.तुषार राठोड, खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते नरसी येथील शिवकृपा मंगल कार्यालय येथे नुकताच प्रदान करण्यात आला.

बकवाड यांनी महाराष्ट्रातील एकमेव अशा विद्यानिकेतन कमळेवाडी येथे शालेय शिक्षण पूर्ण करून उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. जिल्हा परिषद हायस्कूल येथे मागील दशकापासून ते माध्यमिक विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इंग्रजी विषयाचे उत्कृष्टपणे अध्यापन करतात. आजपर्यंत पर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय इंग्रजीत चर्चासत्रे, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये त्यांनी सहभाग नोंदवून तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वीरित्या काम करत आलेले आहेत.

 

शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा अग्रक्रमाणे सहभाग असतो. शाळेमध्ये इंग्रजी विषयासंदर्भात आगळेवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या यशाबद्दल कर्मवीर किसनराव राठोड प्राचार्य गंगाधर राठोड, माजी आ. वसंतराव चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, खुशालराव पाटील उमरदरीकर, व्यंकटराव जाधव, अरुण कुमार थोरवे, विश्वनाथ राठोड, दादाराव आगलावे, शरद नाईक, अंकुश गायकवाड, तुकाराम वडजे, आनंदराव भंडरवार, किशनराव आगलावे, ग्रंथपाल प्रकाश पवार, पत्रकार विकास भुरे पत्रकार बाळासाहेब पांडे, मुख्याध्यापक भूजंग सोनकांबळे, व्ही. जी. मुंडकर, जी.बी.गबाळे, डी.डी. जाधव, एच.जी. अंधारे, शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोषराव केते,उपाध्यक्ष सुभाष पाटील शिंदे, मारुती शिंदे,रघुनाथ शिंदे, उपक्रमशील शिक्षक कैलास शिंदे, राजीव पाटील शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.