दिवंगत नेते डॉ. शंकराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : वैजनाथ स्वामी

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत नेते डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यशवंत  महाविद्यालयाच्या मैदानावर कुसुम महोत्सवात घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.

नांदेड शहरासह जिल्ह्यातील शेकडो शाळेतील हजारो विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. माजी आमदार अमिताताई चव्हाण, माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले , विजय यवनाकर,  परिषदेचे सभापती संजय बेळगे, नाईक, रावणगावकर ,प्रवक्ते संजय पांडागळे, अब्दुल सत्तार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर,युवक शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, संदीप सोनकांबळे विठ्ठल पाटील डक, दीपक पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.