ना.छगन भुजबळ यांच्या निर्देशाचे नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांकडुन स्वागत ; महत्वाची बैठक घेऊन जास्तीत जास्त दिव्यांगांनी अंत्योदय अन्न योजणेच्या शिधापत्रिकेचा लाभ घेण्याचे केले आवाहन :- राहुल साळवे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
नांदेड : वैजनाथ स्वामी
                           आज दि 14/02/2020 रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती जिल्हा शाखा नांदेडची मुख्य कार्यालय रामलीला निवास विष्णुनगर नांदेड येथे एक महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा अथवा आजारी वा दिव्यांग किंवा 60 वर्षे वयावरील जेष्ठ नागरिक आहेत.ज्यांना ऊदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही.ग्रामीण कारागीर अशांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात येणार असल्याचा नुकताच आदेश राज्याचे अन्न.नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री.ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे अशी माहिती बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी ऊपस्थीत सर्व अंध.दिव्यांग.निराधार यांना दिली आहे.
      दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका मिळण्याबाबतची मंत्रालयात आयोजित बैठकीत ना.छगन भुजबळ बोलत होते.ना.छगन भुजबळ म्हणाले कि.”राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजणेच्या कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य.रू 2  प्रतिकिलो गहु व रू 3 प्रतिकिलो तांदूळ या दराने वितरीत करण्यात येते.त्याप्रमाणे पुढिल व्यक्तींना.कुटुंबांना अंत्योदय अन्न योजणेच्या शिधापत्रिका देण्यात येणार आहेत.
                           एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त.दिव्यांग / विधवा.60  वर्षावरील वृद्ध.ज्यांना कुठलाही कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायमस्वरूपी ऊत्पनाचे साधन ऊपलब्ध नाही.आदिम आदिवासी कुटुंबे.(माडिया. कोलाम.कातकरी) भुमीहिन शेतमजूर.अल्पभुधारक शेतकरी.ग्रामीण कारागीर उदा :- कुंभार. चांभार. मोची.विनकर.सुतार तसेच झोपडपट्टितील रहिवासी विशिष्ठ क्षेत्रात रोजंदारीवर काम करून ऊपजिविका करणारे नागरिक जसे हमाल. मालवाहक.सायकल रिक्षा चालविणारे. हातगाडीवरून मालाची ने – आन करणारे.फळे आणि फुले विक्रेते.गारूडी.कचर्यातील वस्तु गोळा करणारे तसेच निराधार व अशा प्रकारे काम करणारे शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींची कुटुंबे.कुष्ठरोगी.बरा झालेला कुष्ठरोगी कटुंब असलेली कुटुंबे.या सर्व व्यक्तींना अथवा कुटुंबांना अंत्योदय अन्न योजणेचा लाभ नियमानुसार देण्यात येतो.परंतु गत अनेक वर्षापासुन नांदेड जिल्ह्यात बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीकडुन विविध आंदोलणे ऊपोषणात या मागणीची अमलबजावणी व्हावी आणि दिव्यांगांना 35 किलो धान्य मिळावे यासाठी लढा देण्यात आला होता.या लढ्याला आणि मागणीला कुठेतरी न्याय मिळाला असुन ना.छगन भुजबळ यांनी कोणताही पात्र लाभार्थी या योजणेच्या लाभापासून वंचीत राहणार नाहि याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचीव महेश पाठक आणि दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते असे राहुल साळवे यांनी आजच्या बैठकीत ऊपस्थीत सर्व अंध दिव्यांग.निराधार यांना कळवीले तसेच नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी या योजणेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
                 आजच्या या बैठकीत संजय धुलधाणी.अमरदिप गोधने.नागनाथ कामजळगे.कार्तिक भरतीपुरम.राजकुमार देवकर.प्रशांत हणमंते. राजु ईराबतीन.शेषेराव वाघमारे. आत्माराम राजेगोरे.संघरत्न.सोनाळे.प्रदिप हणमंते. गणेश सुरोसे.दिलीप झुंजारे. भाऊसाहेब टोकलवाड. दत्ता पाणपट्टे.माधव बेरजे.दिलीप कांबळे. राजु मुरमुरे.मनोहर पंडीत.ईस्तारी हिंगोले.संजय बोईनवाड.प्रकाश तिवारी.अंकुश हट्टेकर.संतोष पवार. रवि कोकरे.जयपाल आडे.विश्वांभर दळवे.भोजराज शिंदे.सिद्धोधन गजभारे. बालाजी कुरूडे. तुलजाराम मंडले.देवेंद्र खडसे.साहेबराव कदम.कमलबाई आखाडे. मनीषा पार्धे.कल्पणा साब्ते.भाग्यश्री नागेश्वर.सरस्वती भालेराव आदि ऊपस्थित होते.