प्राचार्य म्हणजे संस्था व महाविद्यालयात समन्वय साधणारा दुवा असतो   – श्रीकांत पाटील हंगरगेकर

नांदेड नांदेड जिल्हा मुखेड
   संदीप पिल्लेवाड 
         येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मागील काही वर्षांपासून कायम प्राचार्य नव्हते. नुतन वर्षामध्ये नवनियुक्त प्राचार्य डाँ. आडकिणे एस.बी.यांच्या सत्कार समारंभामध्ये वीरभद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हंगरगेकर यांनी प्राचार्य म्हणजे संस्था व महाविद्यालयात समन्वय साधणारा दुवा असतो.या भूमिकेतून नवीन पदभार स्विकारलेले प्राचार्य डॉ. आडकिणे हे निश्चितच कार्य करतील असे विश्वास त्यांच्यावर व्यक्त केले.
      महाविद्यालयीन कर्मचारी व संस्थेने नुतन प्राचार्यांचे भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण कथाकार प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा शिवपुजे , सहसचिव शंकरराव बसापूरे , कोषाध्यक्ष ओंकारअप्पा मठपती , सदस्य बाबुराव कुलकर्णी आणि रमेश बर्दापूरे यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयीन परिवाराच्या व संस्थेच्या प्रेमापोटी नुतन प्राचार्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला आहे. या प्रसंगी जेष्ठ साहित्यीक व ग्रामीण कथाकार डॉ. नागनाथ पाटील यांनी आपली ‘ बाजार ‘ नावाची कथा सादर केले.यावेळी उपस्थितीतांनी मनमुराद आनंद घेतला.

      महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची कारकीर्द मागील अनेक वर्षांपासून उल्लेखनीय राहिलेली आहे. त्याच यशाला कायम टिकवण्याचं काम नुतन प्राचार्य करतील असे मान्यवरांच्या भाषणात मत व्यक्त केले. परिवर्तनाची नांदी या महाविद्यालयात निश्चितच येईल असे यावेळी अनेकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सौ.मनिषा देशपांडे , प्रा.डॉ. विजय वारकड तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. प्रसाद जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. मधुकर राऊत तर मनोगत उपप्राचार्य के.बालाराजु यांनी व्यक्त केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.