कर्नुल येथील मुलीवर अत्याचार करणा­ऱ्यास फाशीची शिक्षा दया   ; भावसार समाजाने केली मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदीप पिल्लेवाड

आंध्रप्रदेश येथील कर्नुल या गावी सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस पोक्या कायदया अंतर्गंत फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे दि. 13 रोजी मुखेड येथील भावसार क्षत्रीय समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली.

आंध्रप्रदेशातील कर्नुल शहरात खाला स्ट्रीटमध्ये राहणा­या 45 वर्षीस मुस्लीम नराधामाने तेथे राहणा­या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून सायकलवर बसवून लैंगिक व शारीरीक अत्याचार केला.

याप्रकरणी आरोपीस अटकही झाली पण या अमानवीय कृत्य करणा­यास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदनातून मागणी केली आहे. या निवेदनावर लक्ष्मीकांत उखळकर,एस.डी.कुसूमकर,गोविंदराव महिंद्रकर, राजेश भागवतकर,संजय पेंडकर,सागर पुकाळे, रमेश भागवतकर, अशोक वावधाने,स्वप्नील भोकरे,डॉ. संजय वावधाने,नारायण सुत्रावे,विलास वावधाने, लक्ष्मीकांत राखोंडे,मोहन भागवतकर,ओमसाई चौडेकर,सचिन बरडे,गोविंद बरडे,सतिष महिंद्रकर,मोहन रणभिडकर,संतोष महिंद्रकर,प्रल्हाद पेंडकर,गोविंद भागवतकर,गोपाळ भागवतकर,पंढरीनाथ भोकरे,राजकुमार उखळकर,डॉ.रामदास वावधाने,विजय वावधाने यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या­ आहेत.