क्रांतिसुर्य राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती घरोघरी साजरी करा- राठोड 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : पवन जगडमवार  
           गोर बंजारा समाजाचे आराध्यादैवत क्रांतिसुर्य राष्ट्र संत श्री सेवालाल महाराज यांची 281 वी जयंती गोर बंजारा समाजानी घरोघरी साजरी करावी असे आवाहन ऑ.इ.बंजारा सेवा संघाचे सुनिल राठोड यांनी केले आहे.
           सतराव्या शतकामध्ये लाखा बंजारा नावांचा राजा होऊन गेला. त्याचे समाजोपयोगी कार्य आपणांस सापडतात. त्यानंतर लाखा बंजारानंतर आठराव्या शतकात अशिक्षीत भटकंती करणार्या गोर बंजारा समाजातील राठोड (रामावत) कुळात संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला.ते आईवाळो,तोडावाळो, सेवादास, बाबालाल,सेवाभाया,  सेवालाल या अनेक नावाने त्यांना ओळखले जातात.सेवालाल महाराजांचा जन्म गोलालडोडी ता.गुत्ती, जि.अनंतपूर, आंध्रप्रदेश येथे झाला.
               सर्व गोर बंजारा बांधव गायी-बैलाच्या सह्याने धन-धान्याचा, सुपारी, दळणवळणाचा व्यापार करत असत. 360 घराचा तांडा चिञदुर्गजिल्ह्या ,सिमोगा, सुरगोंडनकोप्पा, दावनगीरी, सिरशी, मंगलोर, मडकरी, चेन्नई, चितूर, तिरूपती इत्यादी अनेक ठिकाणी व्यापार केले.तेथे माता जगदंबेने सेवालाल महाराजांना दर्शन दिले अशी अख्यायिका आहे.
!! सरसी कोटा भक्ती किदो,देवीनं वचनेम लिदो!!
खेलू कोणी,धुजू कोणी, चारी वात बांध लिदो!!
सेवालाल महाराज यांचात संघर्षाचे व युद्धाचे गुण होते. महाराजांनी या समाजाला 
!! सोतार ओळख सोता करण दिलो!!कोई केणी भजोमत पुजोमत!!
जाणजो छाणजो पचच मानजो!!गोर बंदा मारी शिकवाडीपर ध्यान दिजो!!
छाती करीय जेन साथ दियू!!हाय नाकिय जेर ढेर पडजाय!! 

                           असे अनेक मोलाचे मार्गदर्शन या बंजारा समाजातील अशिक्षीत भटकंती करणार्या गोर बंजारा समाजाला उपयुक्त ठरल्या आहेत. अशा महान क्रांतिकारी संताचा जन्म उत्सव प्रत्येक वाडी तांड्यात दिवाळी दसरा सण म्हणून साजरा करा,प्रत्येकाने घरावर पांढरा ध्वज लावा. व घरासमोर होम लावून महाराजांचा जन्म उत्सव प्रत्येकानी साजरा करावे. असे आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सुनिल राठोड वसुरकर यांनी केले आहे.