ग्रामीण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. कविता जेधे व कु. संपदा पिंपळवार यांचा डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते सत्कार…” बेस्ट फॉर्म वेस्ट ” विषयावर प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक

इतर बातम्या नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर बी.एस्सी. तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनी कु. जेधे कविता कैलास व कु. पिंपळवार संपदा नंदकुमार या विद्यार्थिनींनी प्रा. डॉ. महेश पेंटेवार  यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ. उध्दव भोसले सर व मुखेड-कंधार विधानसभेचे आमदार मा.डॉ.तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

 

नांदेड एज्युकेशन सोसायटी सायन्स कॉलेज नांदेड येथील आयोजित ” बेस्ट फॉर्म वेस्ट “या विषयावर राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत शाळा व महाविद्यालयातील ४० गटांनी सहभाग नोंदवला होता टाकाऊ पासून टिकाऊ चे दैनंदिन जीवनात खूप महत्त्व आहे व जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात साधन, संसाधन कमी असल्यामुळे रिसायकलिंग व पुनर्वापर होणे आवश्यक आहे.

याचाच एक भाग म्हणून ग्रामीण महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी टाकाऊ प्लास्टिक जार व  बॉटल्स पासून फिश एक्वेरियम बनवला त्यासाठी त्यांनी रंगीत दगड, शंख, शिंपले तसेच त्यात जिवंत मासे ठेवले व दोन प्लास्टिक बॉटल चा वापर करून एअर पंप बनवला जो कि पूर्णपणे नैसर्गिक होता व त्या एअर पंपाद्वारे माशांना हवेतून शुद्ध अक्सिजन पुरवल्या जात होते. “टाकाऊ पासून टिकाऊ”  उत्कृष्ट क्रिएटिविटी लक्षात घेऊन वरील राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामीण महाविद्यालयास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. कर्मवीर किशनरावजी राठोड, सचिव गंगाधर रावजी राठोड, मा.आ. डॉ. तुषारजी राठोड, मा. संतोष राठोड, प्राचार्य हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.