खा.चिखलीकरांच्या मागणीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा हिरवा कंदील !  तिरुपती -निजामाबाद धावणारी रॉयलसिमा एक्स्प्रेस नांदेडहून

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र
नांदेड : वैजनाथ स्वामी 
                     तिरुपती -निजामाबाद धावणारी रॉयलसिमा एक्स्प्रेस नांदेडहून सोडावी, नव्याने सुरु करण्यात आलेली नांदेड – मुंबई (राज्यराणी) एक्स्प्रेसला 6 बोगी वाढवाव्यात यासह अन्य रेल्वे विषयक मागण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंगळवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी खा.चिखलीकरांच्या मागण्यांना हिरवा कंदील दाखवत रेल्वे विषयक प्रश्न ताबडतोब सोडवू, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.
         नांदेडच्या मतदार राज्याने लोकसभा निवडणूकीत ’प्रताप’ घडवत अनेक काळापासून अधिराज्य गाजवणा-यांचा पराभव करत सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य नागरिक प्रति तळमळ असलेल्या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. खा.चिखलीकर यांनी निवडणूकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यासाठी दिल्ली दरबारी जंग-जंग पछाडले आहे. प्रत्येक अधिवेशनादरम्यान नांदेडकरांसाठी काहीना काही मिळवले आहे.
                 नांदेड -बिदर नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधी त्यानंतर राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत आणल्यानंतर आता खा.चिखलीकरांनी नव्याने सुरुवात झालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडहून 6 बोगी वाढवाव्यात. त्यात एक प्रथम श्रेणी, एक व्दितीय श्रेणी, एक तृतिय श्रेणी वातानुकूलीत डब्बे स्वतंत्र नांदेडहून द्यावेत. याशिवाय प्रवांशाना मुंबई येथे जाण्यासाठी 3 स्लिपर कोच वाढवावेत. रायलसिमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाठवावी, नांदेडहून पुण्याला जाण्यासाठी दररोज गाडी सोडण्यात यावी, याशिवाय नांदेड – निजामाबाद, नांदेड – आदिलाबाद डेमो रेल्वे सुरु कराव्यात अशी आग्रही मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून निवेदनाव्दारे केली आहे. खा.चिखलीकर यांच्या मागण्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवत मागण्या तात्काळ पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.