अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामुहिक अत्याचार प्रकरणी एस.एफ.आयचे बुधवारी शैक्षणिक बंद ची हाक

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड /पवन जगडमवार 
              रामतीर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षकांनी अमानुष पणे सामूहिकरीत्या बलात्कार करून   आरोपी शिक्षक फरार झाले असून त्या फरार आरोपी ना पोलीसांनी अद्याप अटक न केल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हाभरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय नांदेड या विद्यार्थी संघटनेच्या वतीने उद्या दि 22 जानेवारी 2020 रोज बुधवार रोजी नांदेड जिल्हा शैक्षणिक बंद ची हाक देण्यात आली.
              त्याचबरोबर दुपारी 2 वाजता नांदेड येथिल महात्मा फुले पुतळ्या च्या समोर आयटीआय कॉर्नर येथे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले, त्यामुळे जिल्हाभरातील सर्व शाळा,कॉलेज ,महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व युनिट, कमिटीने आपआपले शाळा, कॉलेज,महाविद्यालय बंद करून या शैक्षणिक बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान एस एफ आय नांदेड जिल्हा कमिटीने केले आहे.
             दि. 25 जानेवारी च्या अगोदर शंकरनगर येथिल साईबाबा विद्यालयातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी अटक झाले पाहिजे अन्यथा – हजारो विद्यार्थी व विद्यार्थीणीना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड वर मोर्चा काढणार असल्याचे – एस एफ आय चे राज्यध्यक्ष कॉ बालाजी कलेटवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

              शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मागासवर्गीय विद्यार्थिनीवर  शाळेतील शिक्षकांनी अमानुष पणे बलात्कार केला आहे सदरची बाब ही शिक्षकी पेशाला व मानवतेला काळीमा फासणारी आहे शिक्षणाचे काम ज्या पवित्र ठिकाणी केल्या जाते ते व ज्यांच्या मार्फत केल्या जाते असे शिक्षक जर अशा मनोवृत्तीचे निघत असतील तर त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे सदर बाबीचा पोलिसांनी कसून तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी घटना अत्यंत निंदनीय आहे वरील घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून पिडीत मुलीला न्याय मिळाला पाहिजे या साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे – मा क प चे नेते कॉ विजय गाबणे यांनी सांगितले