नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

नांदेड जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी मुखेड तालुक्यातील बा-­हाळी जि.प. गटाच्या सदस्य असलेल्या सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांची निवड करण्यात आली.

कॉग्रेसच्या जि.प. सदस्या असलेल्या सौ. अंबुलगेकर हया मागील काळात जि.प.नांदेड मध्ये सभापती राहिल्या असुन त्यांना प्रशासनाचा अनुभव दांडगा असल्याने व कागदपत्रांच्या जुळवाजुळवीमध्ये त्या परिपुर्ण
असल्याने माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांची निवड केल्याचे समजते.

या निवडमुळे मुखेड तालुक्यात कॉग्रेसला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून या निवडीचे मुखेड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.